रायगड जिल्ह्याच्या विकासकामांना गती : जामगाव जैवविविधता प्रकल्पासाठी ८० कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Ajit Pawar Baithak

मुंबई :
रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक पार पडली.
रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पासाठी ८० कोटींचा सुधारीत प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सध्या उपलब्ध असलेल्या ३० कोटींच्या निधीतून सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
बैठकीत तिसे येथील केदारजननी माता देवस्थान परिसरात रोपवे प्रकल्प, संभे गावाचे पुनर्वसन, गिरणे येथे खारभूमी संशोधन केंद्र, पद्मदुर्ग किल्ल्याचा संवर्धन योजनेत समावेश आणि दिवेआगर येथील मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्राची उभारणी यावर चर्चा झाली.
या बैठकीस मंत्री अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकल्पांच्या तातडीच्या अंमलबजावणीचे आदेश दिले असून, निधी, परवानग्या व प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *