
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणार्या उमेदवारांसाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (RDCC) या अग्रगण्य बँकेत तृतीय श्रेणीतील एकूण 200 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 200 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा तसेच उमेदवार MS-CIT किवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.
वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान 21 वर्ष व कमाल 42 वर्ष वय असावे.
अर्ज शुल्क : ऑनलाईन परीक्षेकरिता रु.590 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,600/- रुपये ते 55,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : रायगड (jobs in Raigad)
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / मुलाखत
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 5 सप्टेंबर 2024
RDCC Bank Bharti 2024 Links
ऑनलाइन अर्ज : https://www.raigaddccbrecruitment.com/
अधिकृत वेबसाईट : https://www.rdccbank.com/
संपूर्ण जाहिरात : https://drive.google.com/file/d/1Tm7-BJWQoZt2c2hRksBdsG8V_O-dqt_A/view
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
-
या भरती करिता फॉर्म हे अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील.
-
ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे. सदर पात्रतेबाबतच्या खोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज दाखल केल्यास अशा उमेदवारांवर फौजदारी गुन्हा करण्यात येईल.
-
उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा हि ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतही कागदपत्रे पूर्व तपासणी / छाननी घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या फक्त गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही.
-
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करावयचा सविस्तर सूचना बँकेच्या अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहेत.
-
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
