भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर व ओ.बी.सी.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या सूचने नूसार खालापूर तालुक्यातील हातनोलि गावचे प्रकाश घोगरे यांची उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यांत आली आहे.
रायगड जिल्ह्यात ओबीसी समाजाला एकत्रीत करून भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढविण्यास आणि मजबूत करण्यास योगदान देतील अशी अपेक्षा रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश भगत यांनी व्यक्त केली आहे.या नियुक्तीचे पत्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात देण्यात आले,पक्षाचाआदेश नुसार आपण उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे,मोतीराम ठोंबरे, मंडळ अध्यक्ष प्रविण मोरे यांच्या नेतृत्वाखाली संघटन वाढविण्यासाठी तळागाळात जाऊन प्रयत्न करू असे उपाध्यक्ष प्रकाश घोगरे यांनी सांगितले. सरपंच रीतु ठोंबरे,प्रदीप गोंधळी,गुड्या देशमुख यांच्यासह अनेकानी प्रकाश घोगरे यांचे अभिनंदन केले.