रायगड जिल्हा ग्रंथालय संघांचे ५८व्या वार्षिक अधिवेशनाचं उरणमध्ये आयोजन !

Granth
उरण ( विठ्ठल ममताबादे  ) : ग्रंथालय चळवळ वाढीस लागावे, ग्रंथालय अधिकारी कर्मचारी यांची एकमेकांची ओळख व्हावी. ग्रंथालय स्तरावरील विविध समस्या सुटाव्यात या अनुषंगाने रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने व श्री गोपाळकृष्ण वाचनालय उरण यांच्या सहकार्याने रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ या वेळेत रामकृष्ण आत्माराम पाटील सभागृह, सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज, चिंबलथळी, म्हातवली उरण, जिल्हा रायगड येथे ५८ व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९:३० ते १०:३० प्रतिनिधी नोंदणी व चहापान, सकाळी १०:३० ते १२:३० वा. उदघाटन स्वागत, परिचय, मान्यवरांचे मनोगत, पुरस्कार वितरण, दुपारी १२:३० ते १ प्रमुख अतिथी मार्गदर्शन, दुपारी २ ते ३ ग्रंथालय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, दुपारी ३ ते ३:३० वा. खुले अधिवेशन, सायंकाळी ३:३० ते ४:३० रायगड जिल्हा ग्रंथालय संघांचे वार्षिक सर्वसाधारण सभा, सायंकाळी ४:३० ते ५ वा. समारोप व आभार असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते होणार आहे.प्राध्यापक एल बी पाटील, लेखक संजीवन म्हात्रे, प्र. सहायक ग्रंथालय संचालक मुंबई विभाग कोकण भवन श्रीमती मंजुळा साळवे, प्र. रायगड जिल्हा ग्रंथालय अधिकारी अलिबाग रायगड -अजित पवार, रायगड जिल्हा ग्रंथालय संघांचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, श्री गोपाळकृष्ण वाचनालय उरणचे अध्यक्ष ऍड. पराग म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. सदर वार्षिक अधिवेशन यशस्वी करण्यासाठी श्री गोपाळकृष्ण वाचनालय उरणचे कार्यकारी मंडळ व कर्मचारी वृंद विशेष मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *