रायगडातील चार जागा शेका पक्षाच्या पारड्यात…? आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ

व्यसनाधीनतेचा बंदोबस्त करण्यासाठी शेकाप सज्ज
पेण  :
 रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, अलिबाग व उरण या चार विधानसभेच्या जागा शेका पक्षाच्या पारड्यात पडल्याची बातमी व्हायरल होताच जिल्ह्यात महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. 
 रायगड जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा संदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चासत्र सुरू असतानाच अलिबाग विधानसभा मतदारसंघातून चित्रलेखा पाटील, पेण विधानसभा मतदारसंघातून अतुल म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघातून बाळाराम पाटील आणि उरण मतदार संघातून प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याची बातमी प्रसारित झाल्याने शिवसेना, काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
महाविकास आघाडीने खरोखरच जर शेका पक्षाला या चार जागा दिल्या असतील तर महाविकास आघाडीतील पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तसे जाहीर करणे अपेक्षित होते. 
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून पेण मतदार संघातून विष्णू भाई पाटील किंवा नुकतेच मातोश्रीवर भेटून आलेले प्रसाद भोईर हे जागा वाटपा संदर्भात लक्ष ठेवून होते व त्यांचे कार्यकर्तेही निर्णयाची वाट पाहत होते. याचप्रमाणे उरण मतदार संघात माजी आमदार मनोहर भोईर , पनवेल मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कामगार नेते महेंद्र घरत, अलीबाग मतदारसंघातून सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेसचे प्रवीण ठाकूर संभाव्य उमेदवार होते.
यासंदर्भात आघाडीचे नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *