रामेश्वर कन्स्ट्रक्शन आयोजित दहीहंडीचा आनंद विशेष मुलांनी लुटला

Dysp Fadatare

पेण :

विषेश मुलांना दहीहंडी चा आनंद मिळावा व भारतीय संस्कृती चे जतन व्हावे या उद्देशाने रामेश्वर कन्स्ट्रक्शने या मुलांकरिता दहीहंडीचे आयोजित केले होते.
या दहीहंडी उत्सवामध्ये 54 दिव्यांग मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला. ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती, यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
Nca1
या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम ‘आई डे केअर’ संस्था करत असून गेल्या 13 वर्षांपासून रामेश्वर कन्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे स्वाती मोहिते यांनी व्यक्त केले.
 या अनोख्या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग मुलांना पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, उद्योजक राजू पिचिका, सुषमा पाटील, धर्मेश पोटे आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *