राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि. ६) एकाच दिवशी ११४ नवीन रुग्ण सापडले आहेत, तर ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला ताप आणि श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता १८ झाली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण १५,५१० चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १,२७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी ५७७ रुग्ण सध्या उपचाराधीन असून ६८१ रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईतील परिस्थितीही चिंताजनक असून एकट्या मुंबईत ६१२ रुग्ण आढळले आहेत. देशभरात सध्या ५,३६४ सक्रिय रुग्ण आहेत.