मुंबई ( मिलिंद माने ) : 32 रायगड लोकसभा मतदारसंघात पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने राज्यसभेवर वर्णी लागण्याच जवळपास निश्चित झाले होते मात्र एका केंद्रीय मंत्र्याच्या दबावामुळे तटकरेन ऐवजी प्रफुल पटेल यांची वर्णी लागल्याने तटकरे कमालीचे अस्वस्थ झाले असून स्वतःसह मुलांचे भवितव्य भविष्यातील राजकारणात अंधारात असल्याने प्रदेशाध्यक्ष पद असून देखील तटकरे कमालीचे अस्वस्थ असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ऐकण्यास मिळत आहे
. महाराष्ट्र विधानसभेमधून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळाली मात्र या जागेवर सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची वर्णी लागणार अशी सर्वत्र चर्चा रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होती मात्र ऐन वेळेला केंद्रातील भाजपाच्या एका मंत्राने प्रफुल पटेल यांच्या नावावर सहमती दर्शवून तसा दबाव राष्ट्रवादीचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केल्याने त्यांनी देखील या प्रस्तावाला मूकसंमती दर्शविल्याचे समजते परिणामी तटकरे यांना मोठी नामुष्की पत्करावी लागल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या पवार गटामध्ये चर्चिली जात आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात. विद्यमान खासदार सुनील तटकरे हे या मतदारसंघात प्रभावहीन ठरल्याने व मतदार संघात त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मोठी नाराजी असल्याने त्यांनी लोकसभेऐवजी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र अखेरच्या क्षणी त्यांच्या नावाला केंद्राकडूनच कात्री लागल्याने तटकरे यांचे राज्यसभेवर जाणे हे मनसुबे हवेत विरल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या पवार गटातील . पदाधिकाऱ्यांकडून ऐकण्यास मिळत आहे.
राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर असताना खासदार सुनील तटकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऐवजी स्वतःच्या घरातच सत्तेचा लाभ घेतला मात्र राष्ट्रवादीच्या फुटी नंतर भविष्यकाळ तटकरेंना अंधाराकडे नेणारा ठरणार असल्याची चर्चा रायगडातील तटकरेंच्या विरोधकांकडून चर्चिली जात आहे
तटकरे कुटुंबांचे राजकीय भवितव्य अंधारात?
32 रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढवण्यास तटकरे फारसे इच्छुक नाहीत त्यासाठी त्यांनी राज्यसभेची मागणी पक्षाकडे केली होती मात्र पक्षाने तटकरेन ऐवजी पटेलांना संमती दर्शवल्याने तटकरेंना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे या निवडणुकीत जर पराभव झाला तर तर त्याचा दूरगामी परिणाम श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील त्यांची मुलगी आदिती तटकरे यांच्या निवडणुकीवर तसेच कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या निवडणुकीवर होणार असल्याच्या भीतीने तटकरे यांना ग्रासले असल्याची चर्चा तटकरेंच्या रायगड जिल्ह्यातल्या
निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून ऐकण्यास मिळत आहे
तटकरेंची घराणेशाही भाजपमध्ये चालणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तटकरे यांनी जसे स्वतः खासदार मुलगा आमदार मुलगी आमदार व मंत्री अशी सत्तेची पदे तटकरे यांनी घरातच ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचा धबधबा जिल्ह्यात स्वतःच्या माध्यमातून ठेवला मात्र राष्ट्रवादीच्या फुटी नंतर राज्याचे व रायगडचे राजकारण बघता तसेच मित्रपक्ष भाजपा बरोबर त्यांचे युती असल्याने भविष्यात भाजपा तटकरेंचं घराणेशाही चे धोरण पत्करणार नाही अशी चर्चा भाजपातील पदाधिकाऱ्यांकडून रायगडमध्ये चर्चिली जात आहे त्यामुळे तटकरेंच्या घराणेशाहीला भाजपाकडूनच भविष्यात आव्हान मिळण्याचे संकेत रायगड जिल्ह्यातल्या भाजपा कडून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही