येत्या रविवारी नामदेवनगर येथे साजरा होणार आईचा वाढदिवस तर लेकाची सेवानिवृत्ती

Namdevnagar
अलिबाग : नामदेवनगर येथे स्थीत असणार्‍या कुसुम सिताराम पाटील यांचा 95 वा वाढदिवस तर त्यांचा मुलगा राजू (आनंद) सिताराम पाटील यांची सेवानिवृत्ती कार्यक्रम रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी पाटील वाडा येथे मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.
दरम्यान, अलिबाग तालुक्यातील सांबरी – नामदेव नगर येथील प्रतिष्ठीत घराणं म्हटलं की सिताराम शेट यांच्या घरण्याचे नाव पुढे येतं. पतीच्या निधनानंतर घरात उच्च शिक्षित मुले असूनही आपल्या संसाराचा गाडा या कुसुम माऊलीने स्वत:च्या हातात घेत आज कित्येक वर्ष अविरत परिश्रम करून हाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या माऊलीला दोन मुली व सहा मुलगे असा मोठा परिवार. रविवारी ही माऊली 95 वर्ष पूर्ण करत आहे. याचेच औचित्य साधून रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी कुटुंबा समवेत वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि याच महिन्यात त्यांचा शेवटचा मुलगा राजू (आनंद) हे सध्या ठाणे शहर क्यूआरटी चे इन्चार्ज आहेत . ते सुद्धा वयाच्या 58 व्या वर्षी येत्या 29 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांचा सुद्धा सेवानिवृत्ती सोहळा याच दिवशी करण्याचे योजिले आहे.
सदर हा होणारा कार्यक्रम मु. नामदेव नगर, पोस्ट-कुर्डुस, ता. अलिबाग  या ठिकाणी संपूर्ण कुटुंबासमवेत वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याचे उज्ज्वल पाटील यांनी संगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *