माथेरान शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी मंगेश मोरे यांची आज दि.२४ रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष संजय शरद गवळी,मनिष राणे,सुरज पंडित,कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या आशाताई कदम,माथेरान शहर अध्यक्ष विजय कदम,किशोर हे उपस्थित होते.
मंगेश मोरे हे राजकारणात सक्रिय असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. प्रत्येक सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच हिरीरीने सहभाग घेत असतात. आगामी काळात त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला नक्कीच उभारी मिळू शकते असा विश्वास समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.
मंगेश मोरे यांची युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.