नागोठणे ( महेंद्र माने ) : पोलिस ठाण्यात मंगळवार 23 जानवारी रोजी दोन अल्पवयीन मुला मुलीने सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टबाबत बुधवार 24 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या तातडीच्या शांतता कमिटीच्या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस तत्पर असून कोणीही कायदा हातात घेऊ नका असे प्रतिपादन रोहा डीवायएसपी सोनाली कदम यांनी केले.
या बैठकीत नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमन, उपसरपंच अखलाक पानसरे, ग्रा.प.सदस्य- ज्ञानेश्वर साळुंखे, सचिन ठोंबरे, मा.प.स. सदस्य बिलाल कुरेशी, बापू रावकर, किशोर म्हात्रे,अशपाक पानसरे, सद्दाम दफेदार, चेतन कामथे, नितीन राऊत, निलेश भोपी,खुर्शिद अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मंगळवार 23 रोजी दोन अल्पवयीन मुस्लिम मुला मुलीने सोशल मीडियावर हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्थ व वादग्रस्त टाकलेल्या पोस्टची तक्रार मंगळवारी रात्री दाखल होताच हिंदू-मुस्लिम समाजातील तरुणांसह नागरिक पोलीस ठाण्यात जमू लागले. व तेथे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उपस्थित सर्वांना सहा.पो.नि. संदीप पोमन यांनी शांत करीत योग्य मार्गदर्शन करून संबधित व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्याचे सांगितल्यानंतर जमाव निघून गेला. याबाबत बुधवार 24 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या तातडीच्या शांतता कमिटी बैठकीत दोन्ही समाजाच्या व्यक्तींचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर डीवायएसपी सोनाली कदम यांनी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना मोबाइल दिले आहेत त्या मोबाईलचा वापर विशेषता 16 ते 18 वयोगटातील मुले कशासाठी करतात याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
काही जन सोशल मीडियावर आलेला संदेश न वाचताच पुढे पाठवितात.तसे न करता तो पूर्ण वाच व पूर्ण काळजी पूर्वक वाचूनच टाका,वादग्रस्त संदेश टाकू नये. कोणत्याही कारणाने कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर आहे.कोणीही कायदा हातात घेऊ नये असे प्रतिपादन करून आपणही एक जबाबदार व्यक्ती म्हणून पोलिसांना त्यांचे काम करीत असताना सहकार्य करण्याचे आवाहन शेवटी सोनाली कदम यांनी केले. संदीप पोमण यांनी सोशल मीडियावर कोणताही संदेश ठेवताना काळजी घ्या. कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आमच्याकडे संपर्क साधा.त्याची दाखल आम्ही निश्चितच घेऊ. उपस्थितांचे आभार मानताना विनोद पाटील यांनी कोणत्याही अनुचित घटनेचा आम्ही समर्थन करणार नसून दोषींवर कारवाई होणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केले.