राज्य सरकारने महिला व बालकल्याण विभागाच्या ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना तुर्तास थांबवली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता २ कोटी ३४ लाख महिलांच्या खात्यात जमा झाला आहे, मात्र १० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली.
तसेच, योजनादूतांची नियुक्तीही थांबवण्यात आली असून, त्यांना प्रचार व प्रसिद्धीसाठी मानधन दिले जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचार अन् प्रसिद्धी आचारसंहितेच्या कालावधीत करता येत नसल्यामुळे ही पावले उचलण्यात आली आहेत.