महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 66 वर गुजरात ते चिपळूण एमआयडीसीमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिड चे २४ गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पो मधील एका सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने परिसरात धूर पसरून या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांना या गॅस चा त्रास सहन करावा लागल्याची घटना आज सकाळी घडली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या जीजे १७-युयु-६१७५ हा टेम्पो मंगळवारी गुजरात मधून चिपळूण एमआयडीसी मधील दीपक कंपनीचे हायड्रोक्लोरिक अॅसिड गॅसने भरलेले २४ सिलेंडर घेऊन निघाला होता.
महाड तालुक्यातील दासगाव गावाजवळ बुधवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो आल्या नंतर त्या मधून अचानक एक सिलेंडर मधून गॅस गलती झाली आणि त्याला आग पकडून संपूर्ण परिसरात धूर पसरला मात्र वस्तीच्या बाहेर असल्याने जरी अनर्थ टळला तरी मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना या धुराचा आणि गॅस चा त्रास होऊ लागला. दीड तासा च्या गॅस गळती नंतर त्या ठिकाणी अद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकाऱ्यांना या घटनेवर नियंत्रण आणले.
या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी महाड शहर पोलीस ठाण्याचे फौजदार प्रमोद लांगे,पोह.गणेश पवार,तसेच महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड चे पोलीस उप निरीक्षक गणेश भिलारे,पोह. मंदार लहाने यांनी घटना स्थळी धाव घेऊन वातावरण नियंत्रणा आणन्या साठी.महाड उद्योगिक क्षेत्रातील . सुरक्षा यंत्रणेला पाचारण करत त्या ठिकाणी अग्निशमन दल तैनात ठेवले. सुरक्षा यंत्रणेचे सीडी देशमुख,राजू सासणे,शशिकांत राठोड,रोहन तांबे,ऐबी कुलकर्णी घटनास्थळी पोहचले आणि या होणाऱ्या गळती वर त्यांनी काही क्षणातच नियंत्रण आणले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अनेक अशा प्रकारच्या धोकादायक रसायन मिश्रित पदार्थांची वाहतूक होत असताना प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी व महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी यांचे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या व्यवस्थेतील पदार्थांकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे. केवळ महामार्गावर अवजड वाहतूकदारांकडून हप्ते वसूल करणे व दिवसाढवळ्या वाहन चालकांची लूट करणे या प्रकारामुळे महामार्गावरील आजचा प्रकार घडल्याचे अनेक वाहतूकदारांनी खाजगी मध्ये सांगितले.