माथेरानमध्ये माघी गणपती बाप्पाना आनंदाने निरोप !

Matheran Bapaa Miravanuk
माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : माथेरान मध्ये दि. १३ रोजी जवळपास पंधरा माघी गणपतीची दीड दिवसांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. असंख्य भाविकांनी गावातील ह्या गणेशमूर्तींचे दर्शन घेतले.
आज दि १४ रोजी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून गुलाल उधळून नाचून गाणी गाऊन महिलांनी आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *