माणगांव येथे अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई : टेम्पोसह मुद्देमाल जप्त

Prashant Shinde
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
उपवनसंरक्षक रोहा आणि मा. सहा. वनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली. दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 5.30 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, माणगांव-विळे रस्त्यावर मौजे विळे गावाजवळ डाटा एस टेम्पो (MH 06 BW 7666) ची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान, टेम्पोमध्ये विनापरवाना और बिगर सोलीय लाकूड आढळून आले. लाकडाचा अंदाजे 0.578 घनमीटर साठा, ज्याची किंमत ₹6,515/- आहे, तसेच वाहनाची किंमत अंदाजे ₹1,00,000/- असल्याचे निष्पन्न झाले. एकूण ₹1,06,515/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अजय बळीराम भोकरे (रा. माणगांव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, वनपाल दामू वारगुडे, वनरक्षक किरण जाधव, जनाबाई गुद्दे, गोविंद सावणारे आणि अनिल मोरे यांच्या पथकाकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *