उपवनसंरक्षक रोहा डॉ. शैलेद्रकुमार जाधव व सहा. वनसंरक्षक रोहीत चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली, माणगांव वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली.
दिनांक ११ मे २०२५ रोजी दुपारी १.४५ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, वनरक्षक वैशाली भोर, अनिल मोरे, किरण जाधव व पवन चौधरी यांच्या पथकाने माणगांव येथील मन मंदिर स्वीट जवळ टाटा ट्रक (क्रमांक DN 09 R9047) ची तपासणी केली.
या तपासणीदरम्यान ट्रकमध्ये विनापरवाना खैर (Acacia catechu) सोलीव लाकूड घ.मी. २०.०५६, अंदाजे किंमत ₹१,०५,३०८/- आढळून आले. यासह ट्रकची अंदाजे किंमत ₹८,००,०००/- असून एकूण मुद्देमालाची किंमत ₹९,०५,३०८/- इतकी आहे.
सदर लाकूड हे विनापरवाना वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२)(ब) व ४२ अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात १. रियाज हुसेन (वय ४१), रा. उत्तर प्रदेश व २. रहिम फईम खान (वय २२), रा. उत्तर प्रदेश यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे आणि वनपाल ज्ञानदेव सुभेदार हे करीत आहेत.