श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव गावातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आज सुतारवाडी येथे सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
रायगड लोकसभा २०२४ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार सुनील तटकरे २००९ पासून श्रीवर्धन तालुक्यात आमदार झाल्यानंतर विविध पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले होते. परंतु आमदार रवींद्र राऊत ज्या आदगाव गावातून आपल्या निवडणुकीचा अर्ज भरत असत या आदगाव गावातील गेल्या १५ वर्षात माजी खासदार स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले व माजी आमदार स्वर्गीय रवींद्र जी राऊत यांना मानणारा गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ठामपणे कार्यरत होता.
या पंधरा वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये कधी राष्ट्रवादी सोबत कधी राष्ट्रवादीच्या विरोधात अशा स्वतंत्र पणे भूमिका घेत या कार्यकर्त्यांनी आपली ओळख ठेवली होती. परंतु या वेळच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान श्रीवर्धन च्या आमदार व महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आदगाव येथे प्रचाराच्या सभेवेळी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे , आमदार अनिकेत तटकरे व आदिती तटकरे यांच्या माध्यमातून होणाऱ्या आदगाव येथील प्रवासीजेटी, नळपाणी योजना, शंकर मंदिर इतर अनेक विकास कामांना प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याबद्दल आदिती तटकरे यांच्याकडे मनोगत व्यक्त केले.
त्यानुसार आज रोहा सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विवेकानंद मोरे, शशिकांत कोकाटे, सुरेंद्र मोरे, सुदेश मोरे,अरविंद जयराम कोकाटे, मनीष मोरे, निलेश मोरे, निलेश एकनाथ मोरे, कृष्णा सखाराम मोरे, शुभम मनीष मोरे, शेखर काशिनाथ मोरे, सुंदर काशिनाथ मोरे,प्रणय आत्माराम मोरे, सुधीर विष्णू पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा देवळेकर,सुहासिनी मोरे,सुवर्णा तोडणकर, ज्योती मोरे,जागृती तोडणकर, स्वाती तोडणकर, अस्मिता तोडणकर, सुरेखा भोसले, या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला पर्यायाने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.