मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण !

Collector Office
रायगड : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी दि. 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असून कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी केले आहे.
मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम दि. 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे. या सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी गृहभेटी देणार असून शासनाने दिलेल्या विहित नमुन्यातील माहिती संकलित करणार आहे.
या शासकीय कर्मचाऱ्यांना अचूक व बिनचूक माहिती द्यावी तसेच या कालावधीत उपलब्ध रहावे. हे काम अत्यंत महत्वाचे असल्याने या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *