महाविकास आघाडी तर्फे शनिवारी नागोठणे पंचक्रोशीत बंदची हाक

Nagothane Shivsena

नागोठणे ( महेंद्र माने )  :

महविकास आघाडी,पंचकोशीच्या वतीने बदलापूरमध्ये अत्यंत विकृत व दुष्कृत्य घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी शनिवार 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याच अनुषंगाने नागोठणे पंचक्रोशी येथील महाविकास आघाडीने पंचक्रोशीसह संपूर्ण नागोठणे शहर बंद पुकारण्याची हाक देण्यात आली आहे.

याबाबतचे पत्र नागोठणे व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन यांना महाविकास आघाडी नेते तथा शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख कीशोर जैन, विभाग प्रमुख संजय भोसले, उपसरपंच अकलाक पानसरे, शहर कॉग्रेस अध्यक्ष असफाक पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

या पत्रात सर्व व्यापारी बंधु-भगिनी, भाजी विक्रेते, हॉटेल चालक मालक, प्रवासी वाहतूक, मिनीडोअर, ऑटोरिक्षा या सर्वांनी उस्पूर्तपणे बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी शाखाप्रमुख धनंजय जगताप, ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे व संतोष नागोठणेकर यांच्यासह इम्रान पानसरे,राजू पिताणी,सोहेल पानसरे, जितेंद्र जाधव, रूपेश जगताप, पंकज कामथे यांच्यासह महविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याची एक एक प्रत नागोठणे येथील पोलिस स्टेशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल चालक मालक संघटना, रिक्षा चालक मालक संघटना, मिनिडोअर चालक मालक संघटना, मच्छिमार्केट,मटण मार्केट संघटना यांना देण्यात आल्याची माहिती धनंजय जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *