महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ दर्जा

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' घोषित

मुंबई :

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील नोंदणीकृत गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान दिले जाणार आहे.
वैदिक काळापासून गायींना धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व असून, त्यांच्या पालनपोषणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, आयुर्वेदिक उपचार पद्धतीत पंचगव्याचा वापर, सेंद्रिय शेतीत गायीच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *