महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचा कळंबोली वसाहतीमध्ये जोरदार प्रचार

Bjp Prachar Panvel
पनवेल ( संजय कदम ) : 
पनवेल विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामध्ये शिवसेना सुद्धा अग्रेसर झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात महिला आघाडी व शिवसैनिक कळंबोली वसाहत परिसरामध्ये प्रचार करताना दिसत आहे.
पनवेल विधानसभा मतदार संघात आ.प्रशांत ठाकूर यांनी आतापर्यंत केलेली विकासकामे तसेच कळंबोली वसाहतीसाठी आणलेला निधी याचा प्रचार शिवसेना पक्षाकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कमळासमोरील बटण दाबून विजयी करा, असे आवाहन जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी मतदारांना केले आहे. एकंदरीत कळंबोली वसाहत व परिसरामध्ये रामदास शेवाळे यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा कामाला लागली असून आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी व शिवसैनिक कळंबोली वसाहत परिसर प्रचारार्थ पिंजून काढत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *