महाड | मिलिंद माने
रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगड मधील सर्वात मोठी जत्रा समजली जाणारी महाड चा छबिना उत्सव १८ फेब्रुवारी च्या रात्री व १९ रोजी साजरा होणार असून . यानिमित्ताने महाड परिसरातील आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या मानाच्या पालख्या व शासनकाठ्या यामुळे महाड शहरातील ती रात्र ऐतिहासिक ठरते त्यानंतर छबीना उत्सव संपल्यानंतर मोड जत्रा या दोन दिवसांच्या कालावधीत लहान मुलांपासून वयोवृद्ध मनसोक्तपणे या यात्रेचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे चित्र महाडच्या छबिना उत्सवास पाहण्यास मिळते
महाडच्या छबिना उत्सवाला १८ च्या रात्री रवळनाथ चे चांगभलं ने सुरवात होते आणि भाविकांचे लक्ष लागते ते विन्हेरे च्या श्री झोलाई देवीच्या आणि महाड च्या भोई घाटावर झोलाई च्या पालखीचे आगमन होते आणि एकच गजर होतो आणि खालुबाजाचा वाद्य व नगाऱ्यांचा आवाज याने परिसर दुमदुमून जातो श्री झोलाईचे चांगभलं चांगभलं चा स्वर मध्यरात्रीच्या सुमारास आसमंतात घुमत असल्याचे चित्र भोई घाटावर पाहण्यास मिळते
महाडच्या वीरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवातील १८ फेब्रुवारी २०२६ ची मुख्य रात्र विविध देवादिकांच्या पालख्या आपल्या उंचच उंच काठ्या घेऊन बाजारपेठ मधून वाजत गाजत विरेश्वर देवस्थान मध्ये विसवता रात्री ११ च्या दरम्यान रवळनाथ ची पालखी येते या नंतर . मागोमाग एक एक करत पालख्या व सासण काठी मंदिरात दाखल होत असतात खालुबाजा चा व नगाऱ्याचा आवाज सर्वत्र घुमल्याचे चित्र यावेळी पाहण्यास मिळते एकी कडे मानपान ची तयारी सुरू असते वीरेश्वराच्या प्रांगणात रवळनाथाचं चांगभलं….भैरवनाथाचं चांगभलं….मानाईचं चांगभलं…. पद्मावतीचं चांगभलं…. जनाईचं चांगभलं…. आणि झोलाईचं चांगभलं असा नारा घुमतो. श्री झोलाई चे आगमन पाहण्यासाठी महाड शहरासहित आजूबाजूच्या गावातील लाखो भावी या ठिकाणी उपस्थिती लावतात श्री झोलाई देवीचे खालुबाज्याच्या व नागाराच्या वाद्यात वाजत गाजत . आगमन झाल्यानंतर वीरेश्वर मंदिरात आरती होते व देवांचा, देवीचा गोंधळ सुरू होते भंडाराची उधळण होते दिवटी पेटविण्यात येते अनेक महिला तरुण ,तरुणाई आबालवृद्ध याचा आनंद. घेण्यासाठी अक्षरशः गर्दीतून याचा आनंद कसा घेता येईल यासाठी गर्दी मधून प्रत्येकाची चढावर चालण्याचे चित्र वीरेश्वर मंदिरात पाहण्यास मिळते.
तर दुसरीकडे महाड मधील वीरेश्वराच्या हा देवस्थानापासून लागलेली जत्रेतील दुकांनांसमोर खरेदीविक्रीचा यात्रेसाठी आलेल्या भाविकांचा जोर आणि भाविकांच्या उपस्थितीचा महापूर अशा वातावरणात पोलीस प्रशासनाची सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर देखील उत्साही व दंगा करणार्या तरूणांवर टाकत असते. त्यातच पहाटे च्या सुमारास देवदेवतांच्या पालख्या मंदिरातून बाहेर पडत मुख्य छबिना स्थळी नाचत असतात श्री झोलाई देवीचा मान पहिला व शेवटी विरेश्वर महाराज व त्याच्या पालखीत भाऊ रवळनाथ एकत्र पालखी नाचविण्यात येते भाविक ही पालखी खांद्यावर घेत नाचविण्याचा आनंद घेतात व मद्यरात्री रात्री अनेक ग्रामीण भागातील नवोदित तरुण मंडळी, भाविक सासन काठी नाचवत असतात तीन चार तास पालखी व सासन काठी छबिनाउत्सव च्या ठिकाणी नाचत असतात अनेक महिला सुद्धा या वेळी उपस्थित असतात सूर्य उगवतील येताच पुन्हा छबिनाउत्सव च्या दुसऱ्या प्रहराला सुरवात होते अनेक महिला विरेश्वर पालखी ची पूजा करत ओटी भरत असतात मुख्य छबिनाउत्सव मधून बाजारपेठ मार्गे सर्व पालख्या पुन्हा मंदिरात विसावतात देवस्थानला फेरी मारतात हे पाहण्यासाठी पुन्हा सकाळी महाड तालुक्यातून आलेल्या हजारो भाविकांची गर्दी पाहावयास मिळते.
सकाळी ८ नंतर भक्तीभावाने देवादिकांच्या ओटी भरण्यासाठी महिलांची लगबग वीरेश्वराच्या चारही बाजूला चाललेली असते. एकूणच पारंपारीक भक्तीरस,आणि नवोदित तरुण ,महिला व पुरुष. यांची गर्दी ओसंडून वाहत छबिनोत्सवाचा प्रवास सांगतेकडे चाललेला असतो.
महाशिवरात्री गावातील सासन काठ्या सह आखाडे नाचविण्यात येत असतात याच वेळी गाडी तळातील मोकळ्या जागेत आकाश पाळणा, होडी, रेल्वे गाडी, टोराटोरा,आदी सह लहान मुलांचे पाळणे ,खेळाचे विविध साहित्य कडे खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते त्याच प्रमाणे महिलांच्या सौदर्य साहित्य च्या दुकानात महिलांची कानातले गळ्यातील हातातील वस्तू घेण्याची लगबग सुरू होत असते वर्षभर नवनवीन वस्तूची खरेदी करताना विचार करणारे ग्राहक या छबिनच्या दिवशी सढळ हाताने खरेदी करत असतात जवळपास लहान बच्चेकंपनी ला व महिलावर्गाला महाशिवरात्री पासून पुढील ५ दिवस आनंदाचे जातात . जत्रे मनसोक्त खरेदी करणे तसेच,फिरणे पाळण्या मध्ये बसणे आदी अनुभवत भाविक घेत असतात काही वर्षांपूर्वी या ठिकाणी फक्त वर्षभर लागेल त्या साहित्याचा बाजार या जत्रा निमित्त भरत असे या मध्ये गुळ, मिरची ,कांदा, बटाटे,तांदुळ,कडधान्य. यासह गहू ,तांदूळ, ज्वारी,खोबरे,हळद,शेंगदाणे आदी साहित्य या साहित्याची दुकाने सजली जात असे कालांतराने या मध्ये बद्दल होत गेले आणि छबिना उत्सव मध्ये आकाश पाळणा, कपबशी, मौत का कूवा, पन्नालाल, जादूगार आदी मनोरंजन करणारे साहित्य येऊ लागली वेगवेगळी दुकाने आली या मध्ये सोलापुरी चादर पासून चप्पल,मातीच्या सुबक वस्तू, बांबूच्या वस्तू ,लहान मुलाच्या खेळण्याच्या वस्तू, महिलांच्या च्या बांगड्या,मेकअप चे साहित्य, घरगुती शोभेच्या वस्तू सह मिठाई चे दुकाने च्या माध्यमातून आज मितीस लाखो रुपयांची उलाढाल . महाडच्या छबिना उत्सवात होते.
