महाड तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना वीरेश्वर महाराजांच्या भेटीसाठी त्यांची लाडकी बहीण झोलाई माता विन्हेरे गावातून प्रस्थान मोठ्या थाटामाटा उत्सवात रवाना होत आहे.
महाडच्या ऐतिहासिक छबिना उत्सवासाठी महाड सह परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या या उत्सवासाठी महाडमध्ये दाखल होत आहेत, मात्र वीरेश्वर महाराजांची मोठी बहीण असलेली झोलाई माता ही महाडच्या छबिनाला गेल्याशिवाय महाडच्या छबिना पूर्ण होत नाही अशी ऐतिहासिक कथा आहे. या छबिना उत्सवासाठी विन्हेरे गावातून हजारो भावी सकाळपासून झोलाई मातेच्या देवस्थाना पाशी जमा झाले आहेत पालखीची सजावट माने यांच्या अंगणात पूर्ण झाल्यानंतर व पहिली ओटी माने यांच्याकडून अर्पण झाल्यानंतर बोलाई देवी महाडच्या छबिनासाठी प्रस्थान करते.
महाड ते विन्हेरे हे वीस किलोमीटर अंतर हजारो भाविक तळपत्या उन्हात पायी चालत असतात यामध्ये लहान मुले ,मुलीं वृद्ध व पालखीचे मानकरी खांदेकरी यासह असंख्य भाविक महाडच्या यात्रेसाठी विन्हेरे गावातून गावातून पालखी बरोबर प्रस्थान करीत असतात झोलाई देवीची पालखी पालखी निघाल्यानंतर सुमारे वीस किलोमीटर अंतरापर्यंत तिचे जल्लोषात स्वागत प्रत्येक गावातील नागरिक मोठ्या संख्येने करतात यावेळी तिची ओटी भरण्यासाठी अक्षरशः मोठ्या प्रमाणावर महिलावर्ग सामील झालेले असतात याचबरोबर सोलाई देवीची मानाची शासनकाठी ही नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावातील भक्त आपल्या खांद्यावर काठी घेऊन २० किलोमीटर अंतर पायी चालत असतात हा झोलाई देवीचा महाड पर्यंतचा प्रवास मोठा जल्लोष व उत्साहात साजरा होत असून या उत्सवासाठी दरवर्षी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.