कर्जत तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी किसान क्रांती संघटनेने तहसीलदार तसेच कर्जत प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले आहे. परतीच्या पावसामुळे उभे असलेले भात पीक कापण्या आधीच जमिनीवर आडवे पडले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यासाठी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वत्तीने केली आहे.
या मागणीच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष भरत राणे, रामदास माली, भाऊ खानविलकर, उत्तम शेळके, प्रकाश कांबेरे, मोरेश्वर भगत, सुरेश जाधव, विनायक देशमुख, अरुण शेळके, सदस्य रवींद्र गावंड, शेतकरी रोहिदास बडेकर, मंगेश बडेकर, तानाजी राणे, नारायण राणे, दत्तात्रेय देशमुख, काशिनाथ पादिर आदी उपस्थित होते.
——————————————————
पंचनामे करण्याच्या सूचना या आधीच तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा आम्हाला सूचना दिलेल्या आहेत.तालुका कृषी अधिकारी यांच्या सतत संपर्कात आहोत.