भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू !

Alibag Police Thane
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
अलिबाग तालुक्यातील बुरुमखान आदिवासीवाडी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेला अजय संतोष वाघमारे (वय २६वर्षे राहणार-बुरुमखान आदिवासीवाडी)मारहाण केल्याने मृत्यू झाला असल्याबाबतची तक्रार अर्चना अजय वाघमारे (वय २४वर्षे) हीने अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे. यातील आरोपी राहुल उदय वाघमारे यास अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वरसोली ग्राम पंचायत हद्दीतील बुरूमखान आदिवासी वाडी येथे संतोष बाळू वाघमारे, वय ४५वर्षे आणि राहुल उदय वाघमारे, वय २२ वर्षे यांच्यामध्ये जुन्या वादावरून दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भांडण झाले असता संतोष वाघमारे यांचा मुलगा मयत अजय संतोष वाघमारे हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता राहुल वाघमारे याने दोन्ही हाताने त्याचा गाळा पकडुन त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून पुन्हा गळा दाबला तसेच गुडघ्याने छातीवर आणि पोटावर मारहाण केली.
अजय वाघमारे जागीच बेशुद्ध पडला. त्याला त्याची पत्नी अर्चना अजय वाघमारे आणि इतर लोकांनी औषध उपचार करता जिल्हा रुग्णालय ,अलिबाग येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले. यातील आरोपी राहुल हा जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर डिस्चार्ज दिल्यानंतर आज सायंकाळी साडे सातच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
अलिबाग पोलिस ठाण्यात याबाबत१०८/२०२४, भा.द.वी. ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *