बालसाहित्यिका अरूणा अजित भागवत यांच्या दोन पुस्तकांचा दर्जेदार ग्रंथांच्या यादीत समावेश

बालसाहित्यिका अरूणा अजित भागवत यांच्या दोन पुस्तकांचा दर्जेदार ग्रंथांच्या यादीत समावेश
पोलादपूर | शैलेश पालकर 
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या ग्रंथ निवड समितीने 2023 मध्ये प्रकाशित उत्तम, दर्जेदार ग्रंथांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील लेखिका सौ. अरुणा अजित भागवत यांची इसाप प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेली दोन पुस्तके निवडण्यात आली आहेत.
उत्तम साहित्य, सकारात्मक विचार करायला शिकविणारी आणि व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करणारी आय.एस.बी.एन. नंबर असलेली पुस्तके वाचकांना मिळावीत, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्याच्या ख्यातनाम लेखिका सौ.अरुणा अजित भागवत यांची ‘गुलाम’ हा कथासंग्रह तसेच ‘जंतर मंतर छू’ हा बालकथासंग्रह ही 2023 मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके निवडण्यात आली आहेत.
लेखिका सौ. अरुणा भागवत यांच्या यापूर्वीच्या दोन पुस्तकांना देखील महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ याच्या उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2006 यावर्षी या ‘लाडक्या मुलांनो’ या पुस्तकास साने गुरुजी पुरस्कार व 2013 यावर्षी ‘आनंद फुलवू या’ या पुस्तकाला भा.रा.भागवत पुरस्कार राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *