अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती व शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रमोद ठाकूर यांचे गुरुवारी (दि. 26) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुसुंबळे येथील रहिवासी असलेल्या ठाकूर यांनी राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
ग्रामपंचायत सरपंच म्हणून प्रवास सुरू करत त्यांनी पंचायत समिती सभापती म्हणून जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाने तालुक्याला नवी दिशा मिळाली होती. त्यांच्या अकस्मात जाण्याने तालुक्यात शोककळा पसरली असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.