पोलादपूरच्या श्रीसाईनाथ मंदिरात उद्या गुरुदर्शन व पूजन सोहळा

Arvind maharaj
पोलादपूर (शैलेश पालकर) :
येथील तांबड भुवन श्री साईनाथ मंदिरात रविवार दि. 20 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 03 वाजेपर्यंत गुरुदर्शन व पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी शेलारमामा कुळ परंपरा व समाधीचे तसेच अभिनव शिवथरघळीचे संशोधक तपोनिधी सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे सकाळी 10 वाजता आगमन होणार आहे. सकाळी हरिपाठद्वारे गुरु दर्शन सोहळ्याची सुरुवात होणार आहे.
ज्येष्ठ गुरुबंधू लक्ष्मण पांडुरंग जगताप गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10.30 वाजता व्यासपीठ पुजन, सद्गुरू श्रीगणेशनाथ महाराजांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन होणार आहे. यानंतर भजन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. 
यानंतर तपोनिधी सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे शिष्यगण व साधकांना गुरु मार्गदर्शन व दर्शन दिले जाणार आहे‌. उद्योजक तुकाराम आंबले यांच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *