पोलादपूरचे श्रीदेव काळभैरवनाथ महाराज यांचा होलिकोत्सव काठी नाचविण्याच्या स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Kalbhairav Poladpur
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्याचे गांव असलेल्या पोलादपूरचे श्रीदेव काळभैरवनाथ महाराज आणि ग्रामदैवतांच्या होलिकोत्सवानिमित्त येत्या रविवार, दि. 24 ते शनिवार दि. 30 मार्च 2024 पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीमध्ये हळकुंड जमविणे, होळी, काठी नाचविण्याच्या स्पर्धां, नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा, जागरव्यवस्था, श्रीसत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ, आदिशक्ती महिला मंडळाचे भजन, देवाचा गोंधळ आणि शनिवार दि. 30 मार्च 2024 रोजी रंगपंचमीला ग्रामदैवतांची ग्रामप्रदक्षिणा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार, दि. 20 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती श्रीकाळभैरवनाथ देवस्थान, पोलादपूरचे अध्यक्ष बाबूराव महाडीक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ देवस्थानच्या मंदिराचा कळस, इमारत, मुर्ती, रूपे, दागिने, अंतर्गत सजावट व विद्युत रोषणाई, मंदिराबाहेरील स्थानांची बांधकामं तसेच उत्सवांचे स्वरूप यामध्ये श्रीकाळभैरवनाथ देवस्थान, पोलादपूरचे अध्यक्ष बाबूराव महाडीक यांच्या कारकिर्दीमध्ये विलक्षण सुधारणा झाल्याचे दिसून येत असल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *