पोलादपूरचे एपीआय म्हसकर यांची बदली, पोलीस निरिक्षक अनिल जाधव झाले रूजू, रातोरात झाला निरोप आणि स्वागत समारंभ

Poladpur Police
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांची अलिबाग येथे बदली झाल्याने त्यांना सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी समारंभपूर्वक संस्मरणीय निरोप दिला तर याचवेळी अलिबाग येथून पोलादपूरला रूजू झालेले पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांचे स्वागतही पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. हा सोहळा पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये रातोरात झाल्याने समाजातील स्थानिक मान्यवरांना याबाबत कानोकान माहिती मिळाली नाही.
गेल्या दोन वर्षांपासून सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांनी पोलादपूर तालुक्यात विविध क्षेत्रातील जनतेशी जवळीक साधून आपुलकी निर्माण केली असताना अचानक त्यांची अलिबाग येथे बदली झाल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारे सेवा करायची असल्याने या बदलीला स्वत:हून अनूकूलता दर्शविली.
यावेळी सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांचे सहकारी पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस खुपच भावूक झाल्याचे दिसून आले. पोलीस निरिक्षक धुमास्कर, हेडकाँस्टेबल रूपेश पवार, हे.काँ.सरणेकर, हेकाँ. कोंडाळकर,  हे.काँ. कदम तसेच महिला पोलीस सरणेकर यांनी सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या.
यावेळी पोलीस जीपवर पुष्पवर्षाव करून पोलादपूर पोलीसांनी एपीआय म्हसकर यांना निरोप दिला. याचवेळी अलिबाग येथून पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत पोलादपूरच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *