शहरातील गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा यांच्या वतीने साजरा करण्यात येणारा नवरात्र उत्सव यंदा धूम धडाक्यात, भक्तिमय वातावरणात व आनंदात साजरा केला जात आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी आई कोंबडपाडावासिनीच्या दर्शनासाठी शहरासह तालुक्यातील भाविक गर्दी करतात.
पेण शहरातील सर्वात उंच मूर्ती असलेली आई कोंबडपाडावासिनीचा उत्सव यंदा धूमधडाक्यात होणार असून मित्र मंडळाच्या वतीने ९ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी स्थापना करून आरती, गायिका सायली विकी मानकवळे (खैरे) ज्योत्स्नाई प्रासादिक संगित महिला भजन मंडळ कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर हळदी कुंकू, महाआरती, दांडिया, फानिगेम्स, होम मिनिस्टर, फॅन्सी ड्रेस असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. शेवटी नवव्या माळेला होम त्यानंतर दसऱ्याला सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. मंडळाच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्थादेखील केली जाते. या वर्षी घटस्थापनेची पुजा श्लोक दिनेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आली.
आई कोंबडपाडावासिनीची विसर्जनाची मिरवणूक शहरात मोठ्या दिमाखात भव्य-दिव्य स्वरूपात काढली जाते. ही मिरवणूक बॅन्जो व डी. जे. च्या तालावर नाचत कोंबडपाडा आळीपासून चावडी नका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन, अंबिका मंदिर, कुंभार आळी, नंदीमाळ नाका, गांगळ आळी येथून कासार तलाव येथे आणून देवीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले जाते.
गणेश मित्र मंडळाचे यंदाचे ३३ वे वर्ष असून यावर्षी देखील ८ फूट उंच देवीची मूर्ती आहे. मूर्तीचे रंगकाम समिर बाकाडे सिद्धार्थ राठोड बंटी पोहेकर तसेच सोनाली पवार हीने देवीची साडी तसेच दागिने आदी श्रृंगारीक काम केले आहे.
संतोष भोसले व मनोहर पवार यांनी डेकोरेशन काम केले आहे.नवसाला पावणाऱ्या आणि हाकेला धावणाऱ्या आई कोंबडपाडा वासिनीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शिंगरूत यांनी सांगितले.