JSW कंपनी विरोधात काराव ग्रामपंचायतीची आंदोलनाची घोषणा

Gadab Karav Grampanchayat

PEN न्यूज ऑनलाइन टीम :

स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात काराव ग्रामपंचायतीने आंदोलनाची घोषणा केली आहे.
सरपंच मानसी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कंपनीने ग्रामस्थांची फसवणूक केली असून, स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. तसेच कंपनीने ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर ब्लास्टिंग, वृक्षतोड आणि बांधकाम केले आहे.
ग्रामपंचायतीने १४ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या गोवा गेट जवळ आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *