पेणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ शारीरिक संबंध; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, माजी सरपंच अटकेत

मुरुड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शारीरिक अत्याचार
PEN न्यूज ऑनलाइन | 
लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेशी दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवत तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पेण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना पेण तालुक्यातील नरदासचाळ परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा सत्ताधारी पक्षाचा माजी सरपंच असून सन २०१८ पासून ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत पीडित महिलेला आपल्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन तिच्याशी विवाह करणार असल्याचे आश्वासन दिले. या विश्वासावर आरोपीने महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला २७ मे २०२६ रोजी सायंकाळी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पेण पोलीस करीत आहेत.