
पेण :
पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 251/24 BNS कलम 137(2) अंतर्गत दाखल केलेल्या अपहरणाच्या प्रकरणात एक 16 वर्षीय बालिका, जी दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 24.00 वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार, पेण पोलीसांनी तात्काळ तक्रार घेतली आणि दि. 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 04.20 वाजता गुन्हा दाखल केला.
दरम्यान, तपास सुरळीत सुरू करतांना, पोलिसांनी संशयिताचा कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) आणि लोकेशनवर तांत्रिक तपास केला. पोलिस पथक LHC/121 आणि PC/1951 तलवारे यांना तपासासाठी रवाना केले. तपासाच्या अनुषंगाने, पोलिसांनी पेण ते पुणे, पुणे ते सांगोला, जि. सोलापूर अशी गतीशील तपासणी केली.
सांगोला येथून अपहरण झालेल्या बालिकेला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पेण पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.
