पेणच्या अर्जुन बामणे याचा ऑल इंडिया बाईक स्टंट स्पर्धेत तिसरा क्रमांक

Arjun Baamane

 PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
लोणावळा – इ-लाईट ऑक्टेन इन तर्फे लोणावळ्यातील इंडियन व्हॅली क्लास येथे आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी स्टंट स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील महाडिक वाडी, पेण येथील रहिवासी अर्जुन प्रभाकर बामणे याने आपल्या दमदार कामगिरीने संपूर्ण देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या ऑल इंडिया लेव्हल वरील स्पर्धेत अर्जुनने अवघ्या १४.३ सेकंदात ४०० मीटर अंतर स्वतःची दुचाकी एका चाकावर चालवत सर्वांची वाहवा मिळवली. ही अतिशय अचूक आणि कौशल्यपूर्ण कामगिरी करत त्याने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.
अर्जुन बामणे हा सध्या मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असून, स्पर्धेच्या समारोपप्रसंगी त्याला ट्रॉफी, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
अर्जुनच्या या शानदार यशाबद्दल पेण शहर, तालुका आणि परिसरातील नातेवाईक, हितचिंतक आणि नागरिकांकडून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
तरुणाईसाठी प्रेरणादायक ठरणाऱ्या अर्जुनच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *