पुण्यातील घटना महाडमध्ये होता होता टळली; व्यापाऱ्याच्या अल्पवयीन मुलाने अतिवेगात कार चालवून विजेच्या खांबाला दिली जोरदार धडक

Accident Mahad
महाड ( मिलिंद माने ) :
पुण्यामध्ये प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने केलेल्या कारा अपघाताची पुनरावृत्ती महाड शहरात होता होता टळली. महाड शहरातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने अति वेगाने कार चालवत रस्त्याकडेला असलेल्या एका विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. ही धडक जर विजेच्या खांबाला दिली नसती तर रस्त्यावरील नागरिकांचे नाहक बळी गेले असते.
पुण्यातील पोर्श कार दुर्घटनेची महाडमध्ये होणारी पुनरावृत्ती थोडक्यात वाचली असली तरी अल्पवयीन मुलांकडून शहरांमध्ये वाहन चालवण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. शहरातील एका इलेक्ट्रिक दुकानाच्या मालकाच्या अल्पवयीन मुलाने अति वेगाने कार चालवली आणि रस्त्याकडेल्या असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. या धडके मध्ये विजेचा पोल पूर्णपणे वाकला गेला आहे. हा मुलगा १७ वर्षाचा अल्पवयीन आहे. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एम एच ०६ सी डी ६८४२ ही कार चालवत असताना हा अपघात झाला आहे.
शहरातील महात्मा गांधी मार्गावरील महाड बेकरी कडून छत्रपती शिवाजी महाराज मार्गाकडे जाण्यासाठी भरधाव वेगात कार वळवली त्याच वेळेस कार वरील नियंत्रण सुटल्याने कार विजेच्या खांबाला धडकली. यावेळेस या मार्गावर नागरिकांची वर्ग सुरू होती कार धडकणार हे दिसतात समोरील नागरिकांनी एकच फळ काढला यामुळे पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती टळली आहे हा मुलगा अल्पवयीन असल्याने या मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ज्या मुलाकडून कार अपघात झाला तो अल्पवयीन असल्याने त्याचे वडील सुरेश गंगाजी परमार यांच्या विरोधात भादवि कलम २७९, ४२७, मोटर वाहन कायदा कलम १८४, ५/१८०,३(१), १८४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *