तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या एका खाजगी कंपनीचे दोन टँकर जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कांबळे गाव हद्दीत घडली असून सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड अद्योगिक पोलीस सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील संगमनगर, ईसाने कांबळे येथील रहिवासी अय्याज अन्वर कारभारी वय ३० हे वाहन चालक असून त्यांनी सोमवार २७ मे २०२४ च्या रात्री आपल्या घरासमोरील जागेत त्यांचे एमएच-०६-जी-८८२९ आणि एमएच-०४-सीजी-१६८८ क्रमांकाचे दोन टँकर लावून ठेवले होते.
पहाटे तीन ते सव्वा तीनच्या सुमारास कोणीतरी रॉकेल ओतून हे दोन्ही टँकर जाळण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी आय्याज यांना जाग आल्याने आरोपी त्याच्या मोटरसायकलवरून पळून गेला मात्र घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपीची ही घटना कैद झाल्यामुळे याबाबत अय्याज यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली असून त्याच्या आधारे पोलिसांनी प्रशांत गोविंद महाडिक वय ४० राहणार खर्डी, ता.महाड जिल्हा रायगड याच्या विरोधात भादवी कलम ४३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
जुन्या वादातून ही घटना झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे