पनवेल 188 विधानसभा मतदारसंघातील आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अंतर्गत स्थिर सर्वेक्षण पथकाने (एसएसटी पथक) 25 ऑक्टोबर 2024 रोजी पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे वाहन तपासणी दरम्यान, एक टाटा पंच चारचाकी वाहनातून 6 लाख रुपयांची संशयास्पद रक्कम जप्त केली.
ही कारवाई पनवेल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, पथक प्रमुख भारत राठोड, आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.