पनवेल आरटीओ कार्यालयामध्ये ‘ADC’ नावाखाली चालणाऱ्या दलालगिरी, लाचखोरी व अनधिकृत व्यक्तींबाबत १५ दिवसांत ठोस कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहबाज फारूक पटेल यांनी दिला आहे.
पनवेल आरटीओ कार्यालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासूर ‘ADC’ नावाखाली काही अनधिकृत व्यक्ती खुलेआम वावरत आहेत. या दलालांच्या मदतीने ड्रायविंग लायसन्स, वाहन कागदपत्र ट्रान्सफर, तपासणी व इतर सेवा या नागरिकांकडून बेकायदेशीररित्या लाच घेऊन पूर्ण केल्या जात आहेत. हा प्रकार केवळ गैरकायदेशीरच नाही, तर सामान्य नागरिकांच्या हक्कांची शर्तस पायमल्ली करणारा आहे. त्यामुळे ADC च्या नावाखाली वावरणाऱ्या सर्व अनधिकृत व्यक्तींना त्वरित आरटीओ कार्यालयातून हद्दपार करावे, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसेच मागील ३ महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करून दोषींचा पर्दाफाश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहबाज फारूक पटेल यांनी पनवेल आरटीओ कार्यालयाला केली आहे. तसेच या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेलच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.