पनवेल रेल्वे स्थानकावर सापडली तीन वर्षांची चिमुरडी; पालकांचा शोध सुरू

Shivani
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर अंदाजे तीन ते चार वर्षांची लहान मुलगी रडत असताना सना आयाज घटकरी या रेल्वे पोलीसाच्या निदर्शनास आली. सदर मुलगी स्वतःचे नाव शिवानी असे सांगत असून तिच्या पालकांचा किंवा तिला सोडून गेलेल्या व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत.
मुलीचे वर्णन:
वय: अंदाजे ३ ते ४ वर्षे
रंग: गहू वर्ण
वेशभूषा: निळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट व ब्राऊन रंगाची फुल नायटी पॅन्ट
विशेष लक्षण: दोन्ही पाय गुडघ्यात वाकडे
मुलगी सापडल्याची घटना
पनवेल स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर ही चिमुरडी एकटीच रडत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तिला शांत करत तिची माहिती विचारली. तिने आपले नाव शिवानी सांगितले, मात्र तिच्या आई-वडिलांविषयी कोणतीही ठोस माहिती देऊ शकली नाही. याबाबतचा  पनवेल रेल्वे पोलिस ठाणे गु.र.नं. १६/२०२५कलम ९३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
पालकांचा अथवा नातेवाईकांचा शोध सुरू
पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे की, ही मुलगी चुकून हरवली असावी किंवा तिला कुणी जाणून-बुजून येथे सोडून दिले असावे. तिच्या पालकांचा अथवा तिला सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून माहिती घेतली जात आहे.
सर्व नागरिकांना आवाहन
जर कोणाला या मुलीविषयी किंवा तिच्या पालकांविषयी कोणतीही माहिती असेल, तर कृपया त्वरित पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी बोरटे मो. 9821425404 यांच्याशी संपर्क साधावा.
ही चिमुकली सुरक्षित असून, पोलिसांकडून तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळाल्यास त्वरित जनतेला कळवले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *