पनवेल रेल्वे स्थानकातून फलाट क्र. ५ वरुन प्रवासाकरिता एक इसम बसल्यापासून मिसिंग झाला आहे. तो अद्याप पर्यन्त घरी पोहोचलेला नसल्याने तो मिसिंग असल्याची केस दाखल करण्यात आली आहे.
भिकाम दामोदर सिंग राहा-सेक्टर-५ , करंजाडे, पनवेल / गाव – निबोरा (up) (वय ३५ ) असे या इसमाचे नाव असून ,उंची ५फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, केस काळे ,रंग सावळा ,चेहरा उभट ,नाक सरळ, डोळे काळे असून अंगात हिरव्या रंगाचा टीशर्ट व नेसनीस खाकी रंगाची पॅन्ट परीधान केली आहे. त्याला हिंदी भाषा अवगत आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल रेल्वे पोलीस ठाणे किंवा पोउपनिरी – गोपाळे यांच्याशी संपर्क साधावा.