पनवेल येथे डाक अदालतीचे आयोजन

Post Office
रायगड : सोमवार, दि.22 जानेवारी 2024 रोजी, दुपारी 15.00 वा. पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन, 2 रा माळा, पनवेल मुख्य डाकघर यांच्या कार्यालयाद्वारे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, रायगड विभाग अलिबाग सुनिल थळकर यांनी दिली आहे.
नवी मुंबई रिजन विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झाले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे.
इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन, 2 रा माळा, पनवेल मुख्य डाकघर यांच्याकडे दि. 15 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचेल अशारितीने पाठवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *