राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अक्षय माने (28 वर्षे रा.आदर्श सोसायटी) रंग गोरा, अंगाने सडपातळ, उंची 5 फुट 5 इंच, डोक्याचे केस काळे बारीक, दाढी मिशी बारीक, डोळे काळे असून अंगात राखाडी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट व पायात चप्पल आहे. हिंदी व मराठी भाषा अवगत असून, सोबत मोबाईल फोन आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा पोलीस हवालदार ए.एस.डोईफोडे मो.नं.8108334467 येथे संपर्क साधावा.