पनवेल परिसरात आढळला मृतदेह !

Body
पनवेल ( संजय कदम ) :
पनवेल परिसरामध्ये एका ङोझी इसमाचा मृतदेह सापडला आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय ६० ते ६५ वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे साडे ५ फुट, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, डोक्यावर टक्कल पडलेले व बाजुचे केस पांढरे, दाढी मिशीचे केस पांढरे व बारीक, कपाळ मोठे, नाक सरळ, अंगात नेसुन मळकट रंगाचा तपकिरी व काळया रंगाच्या उभ्या पट्ट्याची डिझाईन असलेला फुल बाह्यांचा शर्ट व काळया रंगाची फुल पॅन्ट, व अंगावर भगव्या रंगाचा गमछा असे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उप निरीक्षक एस डब्ल्यू वायकर यांच्या संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *