पनवेल जवळील मुंबई – पुणे महामार्गावर पुणे लेनवर किमी 9/100 येथे कोन गाव जवळ झालेल्या तीन गाड्यांच्या अपघातामध्ये ३ जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे.
यातील स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 12 डब्लू जे 8707 वरील चालक नामे शिवम रामबळी गौतम राहणार वाघोली पुणे हे मुंबई ते पुणे बाजूकडे पुणेलेन किमी 9/100 याठिकाणी आले वेळी त्यांना झोप लागल्याने बाजूने जाणारे अज्ञात वाहनास ठोकर लागल्याने पहिल्या लेनवर आडवी झाल्याने पाठीमागून येणारा पिकप क्रमांक एम एच 13 इ पी 0724 वरील चालक नामे विशाल दीपक पांढरे राहणार पंढरपूर यांच्या गाडीला समोर आल्याने ठोकर लागून अपघात झालेला आहे.
या वेळी एम एच 12 डब्लू जे 8707 स्विफ्ट डिझायर कार मधील सुस्मिता शिवनगन वय 28 वर्षे त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झालेले आहे तर लोहा झिंक राजा सिंग वय 30 वर्ष राहणार पुणे हे सुद्धा जखमी झाले आहेत. पिकप क्रमांक एम एच 13 इ पी 0724 मधील इसम नामे ओमकार पांडुरंग गुरव राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
या अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली आयआरबी क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला काढण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पळस्पे मोबाईल वरील स्टाफ व आयआरबी स्टाफ व पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी रावना झाले होते.