नेरळमध्ये राजकीय भूकंप ! सरपंच यांच्या भष्ट्र व मनमानीला कारभाराला कंटाळून 14 सदस्यांचा तडकाफडकी राजीनामा

Neral Ghampanchayat Sadasya

माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : उषा पारधी

कर्जत ( गणेश पवार ) :

रायगड जिल्ह्यात आर्थिक उलाढाल म्हणून ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या भष्ट्र व मनमानी कारभाला कंटाळून नेरळ ग्राम पंचायतीचे उप सरपंच मंगेश राजाभाऊ म्हसकर यांच्या सह आठ सदस्य यांनी आज नेरळ ग्राम पंचायत कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेत सरपंच यांच्या भष्ट्र कारभाराचा पोलखोल व मनमानीचे गंभीर आरोप करत, आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.
नेरळ ग्रामपंचायत ही नागरि समस्या, भष्ट्राचार, मनमानी कारभार, अशा आदी विषयानुसार नेहमी चर्चेचा विषय बनला असताना, व नेरळ ग्राम पंचायतीचा पायउतार होण्याचा कालावधी हा काही महिन्यावर येऊन ठेपला असताना, गुरवार दि. १८ जुलै २०२४ रोजी नेरळ ग्रामपंचायत कार्यालया मध्ये उप सरपंच मंगेश म्हसकर यांच्या सह आठ सदस्यांसह शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस राम राणे, भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष, शिंदे गटाचे नेरळ शहर अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उप सरपंच मंगेश राजाभाऊ म्हसकर यांनी सरपंच उषाताई पारधी यांच्या भष्ट्र व मनमानी कारभारामुळे नेरळच्या नागरिकांची मना प्रमाणे कामे करता येत नसल्याने व आम्हाला सक्रिय सहभाग घेत येत नसल्याने प्रथम नेरळचे नागरिक व मतदार यांची माफी मांगत नागरिकांची एक गैरसमज आहे की सरपंच या महिला व आदिवासी असल्या कारणानी त्यांना गावाचा कारभार कळत नाही. उप सरपंच मंगेश म्हसकर हे सीनियर आहेत व सदस्य हे सुज्ञ आहेत तरी देखील गावाच्या समस्या का सुटत नाही. त्यांचे कारण सरपंच पदाचा कार्यभार स्विकारल्यावर एक महिन्यानंतर त्यांनी स्वतःचा अधिकार बजवण्यास सुरुवात केली.
मात्र सदस्यांच्या सुचने कडे लक्ष दिले नसल्याने गावाची सध्या परस्थिती अशी झाली असल्याचे व त्याचे मुख्य कारण म्हणजे सरपंच यांचे पत्ती हे ग्राम पंचायतीचे कर्मचारी असुन, त्यांनी गेल्या तीन वर्षात कोणत्या विभागात काम केले आहे. हे प्रत्रकार बंधूनी तपासुन पाहावे असे बोलत जर सरपंच यांचा त्यांचे पत्ती कुष्णा पारधी कर्मचारी यांच्यावर कोणता धाक नाही. तर इतर कर्मचारी कामगारांवर काय धाक असेल, त्यामुळे उपस्थित समस्या कशा सोडविल्या जातील यांचे हे एक कारण आहे. तर आरोग्य विभागातील कर्मचारी यांची इतर विभागात भरती केल्याने व आरोग्य कर्मचारी यांची संख्या कमी होत असल्याने या संदर्भात मासिक सभेत वारंवार प्रश्न उपस्थित केले मात्र आरोग्य विषयी प्रश्नाकडे ही सरपंच यांनी दुर्लक्ष केल्याने नेरळ मध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याची परस्थिती आहे.
तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी हे थक्कीत वेतन मिळण्यासाठी अंदोलनाला बसले असताना देखील दि. ११ मार्च २०२४ रोजी सरपंच यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे नेरळ ग्राम पंचायत कार्यालय हे रात्री ११ वाजे पर्यंत सुरू ठेवून गैरकृत्य करत १५ वित्त आयोग निधीतून सुमारे १४ लाख रूपये हे कोणत्याही वस्तू खरेदी न करता त्यांनी वस्तू खरेदीसाठी विड्रॉल करत बिले काढल्याचा आरोप उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी तर काही बांधकाम व्यावसायीक यांचे पाणी पट्टीचे लाखात असलेले बिल हे सरपंच यांचे पत्ती व काही कर्मचारी यांना हाताशी धरून हजारात कमी करून सरपंच यांनी पदाचा गैरवापर करत ग्राम पंचायतीचे आर्थिक नुकसान करत बांधकाम व्यावसायी यांना लाखोची सुट दिल्याने त्या पैकी निर्माण नॅनो सिटी साधारण बिल २ लाख ३० हजार पैकी प्रत्यक्षात ६३ हजार रू पाणी पट्टी बिल सिकारून १ लाख ७० हजाराची सुट दिल्याचा आरोप सदस्य संतोष शिंगाडे यांनी केला असल्याचा व या संदर्भात दि. ०८ एप्रिल २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांच्या कडे सरपंच यांची चौकशी संदर्भात लेखी मागणी केल्याचे व या सरपंचाच्या भष्ट्र व मनमानीला कारभारामुळे आज आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडू शकत नसल्याने आम्ही सत्ताधारी उप सरपंच मंगेश राजाभाऊ म्हसकर, सदस्य संतोष गोविंद शिंगाडे, शंकर किसन घोडविंदे, राजेंद्र शिवराम लोभी, श्रद्धा नरेंद्र कराळे भाजपा व गीतांजली प्रभाकर देशमुख, उमा सचिन खडे, जयश्री मनोज मानकामे शिंदे गट असे एकूण नऊ सदस्य आमच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे उप सरपंच मंगेश म्हसकर यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर पणे सांगितले आहे.
 थेट सरपंच रावजी शिंगवा व धर्मानंद गायकवाड हे मयत दोन सदस्य सोडून विरोद्यात असलेले सदस्य प्रथमेश रोहीदास मोरे, नितिन आलु निरगुडा, पार्वती आरूण पवार, शारदा आरूण सालेकर व आतुल शांताराम चंचे या पाच सदस्यांनी ही सरपंच उषा पारधी यांच्या भष्ट्र व मनमानीला कारभार कंटाळून आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. तर सरपंच उषाताई पारधी यांच्या भष्ट्र व मनमानीला कारभार कंटाळून नेरळ ग्राम पंचायतीच्या एकूण १४ सदस्यानी दिलेल्या राजीनाम्याची प्रशासन स्तरावरून दखल घेऊन पशासन शिंदे गटाच्या सरपंच उषाताई पारधी यांची चौकशी करून यांच्या विरोधात काय कारवाई करणार या कडे मात्र समस्थ नेरळकरांचे लक्ष लागले आहे.
—————————————————–
माझ्यावर केलेले आरोप यांच्यात काही तथ्य नाही. आज ग्रामपंचायतमध्ये आल्यावर मला हा प्रकार समजला. पण ठीक आहे जे आरोप केले ते त्यांनी सिद्ध करावे. मी प्रामाणिकपणे आजवर माझे काम केले. प्रत्येक सदस्याला माझ्यापरीने मी मदतच केली आहे. तरी माझ्यावर हा राग का ? हे मला समजले नाही. कर्मचारी आंदोलन काळात काही महत्वाच्या गोष्टी आलम, टीसीएल आदी गोष्टी तात्काळ हव्या होत्या. त्यासाठी मी पैसे दिले तर चुकलं काय ?
माझ्या पतीवर कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे पण त्यांनी कुठल्या कामात हस्तक्षेप केला, कुठल्या कागदावर सही केली का हे सिद्ध करावं ?
…उषा पारधी, सरपंच नेरळ ग्रामपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *