नागोठण्यात 11 मे रोजी रंगणार जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार तर 12 मे रोजी नृत्याची मेजवानी !

Kabaddee
नागोठणे ( महेंद्र माने ) :
 छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आठवडा बाजारामध्ये नागोठणे विभागीय अध्यात्मिक,सांस्कृतिक,कला क्रीडा व सामाजिक संस्था आयोजित शनिवार 11 मे रोजी जिल्हास्तरीय कब्बडी चा डाव रंगणार असून रविवार 12 मे रोजी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हॉटेल रुचि येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत मागील जमाखर्चाला मंजूरी मिळाल्यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये 11 व 12 मे रोजी भव्य दिव्य जिल्हास्तरीय कब्बड्डी व नृत्य स्पर्धा आयोजित करण्याचा व कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कृष्णाजी धामणे यांची नेमणूकीचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
यावेळी कार्याध्यक्ष विलास चौलकर, खजिनदार एकनाथ ठाकूर, सचिव संदेश गायकर, सहसचिव चेतन कामथे, कायदेशीर सल्लागार ॲड.महेंद्र धामणे, सल्लागार शामकांत नेरपगार, महेंद्र माने, राज वशंपायन, राजू जोशी,एकनाथ दळवी, रोहिदास हातनोलकर, गंगाराम पारंगे, महेंद्र कोंडे, विहार हेंडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये कब्बड्डी स्पर्धेसाठी – प्रथम क्रमांक 55,555/-, व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 33,333/- व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 22,222/- व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक11,111/- व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट चढाई – एल.एल.डी. टीव्ही, उत्कृष्ट पकड – सायकल, पब्लिक हिरो – कुलर
तसेच नृत्य स्पर्धेसाठी ग्रुप डान्स – प्रथम क्रमांक 15,000/- व चषक, द्वितीय क्रमांक 10,000/- व चषक, तृतीय क्रमांक 07,000/- रुपये व चषक, उत्तेजनार्थ 05,000/- रुपये व चषक, वयक्तिक स्पर्धा – मोठा गट प्रथम क्रमांक 10,000/- व चषक, द्वितीय क्रमांक 07,000/- व चषक, तृतीय क्रमांक 05,000/- व चषक, उत्तेजनार्थ 01.000/- व चषक तसेच लहान गट प्रथम क्रमांक 07,000/- व चषक, द्वितीय क्रमांक 05,000/- व चषक, तृतीय क्रमांक 03,000/- व चषक तसेच उत्तेजनार्थ01,000/- व चषक असा प्रकारचे भरघोस बक्षीसे देण्यात येणार असल्याची माहिती देऊन या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर म्हात्रे व कार्याध्यक्ष विलास चौलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *