नागोठणे : सहा. पो. नि. संदीप पोमण यांचा कृतज्ञतापूर्वक निरोप समारंभ संपन्न

Mahendra Mane
नागोठणे ( महेंद्र माने ) :: पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांची अलिबाग येथील स्थानिक गुन्हा शाखेत बदली झाल्याने शुक्रवार 26 जानेवारी रोजी नागोठणे पत्रकार संघाकडून सरपंच सुप्रिया संजय महाडीक, मा.जि.प. सदस्य किशोर जैन, मा.जि.प.सदस्य नरेंद्र जैन,उपसरपंच अखलाक पानसरे, भाई टके, मा.सरपंच डॉ.मिलिंद धात्रक, दर्शना जवके, संघाचे अध्यक्ष उदय भिसे, सल्लागार राजेश पोवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या वेळी नागोठणे हे शांतता प्रिय शहर असल्याचे प्रतिपादन संदीप पोमण यांनी केले.
यावेळी एएसआय प्रमोद कदम,ग्रा.प.सदस्य- सचिन ठोंबरे व संतोष नागोठणेकर,ग्रा.प.सदस्या- शबाना मुल्ला,पूनम ईप्ते काळे,अमृता महाडीक,भाविका गिजे यांच्यासह डॉ.अनिल गीते,विवेक सुभेकर,सुनील लाड,अनिल महाडीक,दिगंबर खराडे,प्रथमेश काळे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
नागोठणे पत्रकार संघाकडून संदीप पोमण यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेट वस्तु मान्यवरांच्या हस्ते देऊन दिलेल्या निरोप समारंभाला उत्तर देताना पोमण यांनी मी गेली सात आठ महीने येथील पोलिस ठाण्याचा कारभार चालवीत असताना मला येथील पत्रकारांसह शहर व विभागातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. नागोठणे हे शहर अतिशय शांतता प्रिय शहर असून येथील सर्व समाजातील नागरीक एकमेकांच्या प्रत्येक सणात भाग घेत गुण्या गोविंदाने नांदत असून माझ्या कारकीर्तीत ठाण्याच्या हद्दीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही. तसेच दाखल झालेले सर्व गुन्हे उघडकीस आल्यामुळे पोलिस व जनता यामध्ये चांगले नाते निर्माण झाल्याचे असल्याचे सांगून येथील पोलिस ठाण्याची सर्व सोयीने युक्त अशा अत्याधुनिक वास्तूचे काम माझ्या हातून होण्याचे भाग्य मला मिळाल्याचे शेवटी संदीप पोमण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *