नागोठणे ( महेंद्र माने ) : श्री बापुजी महाराज मंदिराचे जीर्णोद्धार व कलशारोहण मंगळवार 09 जानेवारी रोजी पूरोहित धनंजय गद्रे यांच्या मंत्रौउच्चाराने सरपंच सुप्रिया महाडीक,यावेळी जोगेश्वरी ट्रस्ट अध्यक्ष नरेंद्र जैन,सचिव भाई टके, मा.सरपंच डॉ.मिलिंद धात्रक,जीर्णोद्धार ट्रस्ट अध्यक्ष मोहन नागोठणेकर,उपाध्यक्ष तसेच ग्रा.प.सदस्य संतोष नागोठणेकर,सचिव अनिल नागोठणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.जि.प.सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर नागोठणे शहाराला एक ऐतिहासिक वारसा आहे तो जपणे गरजेचे असल्याचे किशोर जैन यांनी सांगितले.यावेळी उपसरपंच अकलाक पानसरे, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे,प्रकाश कांबळे,सचिन ठोंबरे यांच्यासह विलास चौलकर, बापूमहाराज रावकर,चंद्रकांत गायकवाड,कीर्तीकुमार कळस,ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांच्यासह विजय नागोठणेकर, श्रीधर नागोठणेकर,दीपक नागोठणेकर,शैलेश नागोठणेकर,मंगेश नागोठणेकर,विशाल नागोठणेकर तसेच नागोठणेकर परीवार व विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सोमवार 08 जानेवारी रोजी सायं. 6.00 वाजण्याच्या दरम्यान कुंभारआळी ते बापुजी मंदिर कलश दिंडी काढण्यात आली. मंगळवार 09 जानेवारी रोजी सकाळी 9.00 ते 10.00 वा. स्थळ शुद्धीकरण व श्री गणेश पूजन,10.00 ते 11.00 प्रसाद,वास्तुशांती,11.00 ते.12.35 मूर्ति प्रतिष्ठापना,पूर्णाहुती व कलश रोहण त्यानंतर किशोर जैन यांच्या हस्ते लोकार्पण रोहळा झाल्यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना किशोर जैन यांनी सांगितले की, बापुजी महाराज मंदिराचे आज लोकार्पण होत आहे. नागोठणे शहाराला एक ऐतिहासिक वारसा असून त्याची नोंदी सरकार दरबारी असून त्याच्या आधारावर संबंधित खात्याला पत्र देऊन योग्य माहिती घेत त्या त्या भागाचा चांगला विकास करता येणार असल्याचे सांगून त्यासाठी आपण जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरीही सर्वांनी वेगळं न राहता एकत्रितच राहून विविध मार्गाने विकास निधि आणण्याचा निश्चितच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे किशोर जैन यांनी सांगितले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडल्यानंतर 2.00 ते 3.00 महाप्रसाद,सायं.7.00 ते 8.00 श्री संत सेवा मंडळ, नागोठणे व श्री संत सेवा माऊली हरीपाठ मंडळ, कडसुरे यांचा हरीपाठ,रात्री 9.30 तए 10.30 वा. जागरण करून कार्यासक्रमाची सांगता करण्यात आली.