नेहमीच गजबजलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष शिवराज गोवर्धन पोलसानी यांनी लावलेल्या बॅनरच्या वर राज साहेब ठाकरे,शर्मिला ठाकरे व अमित ठाकरे यांचे फोटोमध्ये गणराय मुशकारुढ असलेला फोटो तसेच खाली मनसे नेते गोवर्धन पोलसानी व मनसे उपजिल्हाध्यक्ष शिवराज पोलसानी यांच्या फोटोंसह खालील मजकूर देण्यात आला आहे.
बा गणराया निघालात… येताय ! या या उत्सव आपलाच आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत…. पण लाज वाटते हो!! फिल्टर पाणी नाही देऊ शकत, लाज वाटते… २४ तास अखंडित विज पुरवठा नाही पुरवू शकत, लाज वाटते… उत्तम आरोग्य सेवा नाही करु शकत, लाज वाटते… जलद व सुरक्षीत प्रवासासाठी खड्डे मुक्त रस्ते नाही बांधू शकत, लाज वाटते… मोठ्ठे मोठ्ठे उद्योग असुन हि नोकऱ्या नाही देऊ शकत, लाज वाटते… वीना डोनेशन मोफत शिक्षण नाही शिकवू शकत, लाज वाटते… असो, गणपती बाप्पा मोरया….
या मजकुराचा लावलेल्या बॅनरची चर्चा नागोठणे शहर व विभागात रंगत असून बॅनर वाचल्यानंतर ‘आता तरी सुबुद्धी दे….’ अशा प्रतिक्रिये सह जनता जनार्दन बाप्पाकडे साकडे घालत आहे.